सावंतवाडीत रानभाजी आस्वाद व प्रदर्शनाचे नगराध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन

214
2
Google search engine
Google search engine

महिला व बालकल्याण समितीच्या वतीने आयोजन

सावंतवाडी ता.२७: येथील महिला व बालकल्याण समिती यांच्या माध्यमातून भरविण्यात आलेल्या रानभाजी आस्वाद व प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष साळगावकर यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले.या प्रदर्शनात विविध रानभाज्यांच्या पाककलाकृती मांडण्यात आल्या होत्या.यावेळी यात सहभागी महिलांना सहभाग प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.
येथील नाथ पै सभागृहात हे प्रदर्शन भरविण्यात आले होते.या प्रदर्शनात शेपू,कुरडू,टायकळा,अळू,शेवगा,गुळवेल व इतर रानभाज्यांच्या पाककलाकृती मांडल्या होत्या.या प्रदर्शनात अक्षता मडगावकर,नीलांबरी पटेल,उत्कर्षा पटेल,मनाली राऊत,धनश्री सावंत,शर्मिला गावडे,हेमांगी माने,नेत्रली निरवडेकर,सुमन जोशी आदी महिलांनी सहभाग घेतला होता.
यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर,नगरसेविका शुभांगी सुकी,दिपाली भालेकर,उत्कर्षा सासोलकर,भारती मोरे,आसावरी शिरोडकर आदी उपस्थित होते.