सिंधुदुर्गनगरी-प्रतिनिधी
शासनासोबत झालेल्या बैठकामध्ये शासनाने तत्वत: मान्य केलेल्या मागण्यास सहा वर्षाचा कालावधी होवुनही शासनाकडुन अद्यापपर्यंत कोणताही शासन निर्णय निर्गमित न झाल्याने आता महसुल कर्मचाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून उद्या २८ ऑगस्ट रोजी महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने सामुदायिक रजा आंदोलन छेडण्यात येणार आहे. तर ५ सप्टेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याच्या निर्णय महसूल कर्मचारी संघटनेने घेतला आहे.
यापुर्वीचे चार टप्प्यातील आंदोलन यशस्वीपणे पुर्ण केल्यानंतर. राज्यातील पुरपरिस्थीतीमुळे पुरगस्तांचे पुनर्वसन , स्थलांतर , आपद्ग्रस्तांना मदतीचे वाटप, पंचनामे आदि बहुतांश कामे महसुल अधिकारी कर्मचारी यांना करणे आवश्यक असल्याने १६ ऑगस्ट २०१९ रोजीचे लेखणीबंद आदोलन रद्द केले होते.
मात्र आता ही कामे संपत आल्याने पुढील टप्प्यातील आंदोलनाचे सुधारित वेळापत्रक निश्चीत करण्यात आलेले असुन दिनांक २८ ऑगस्ट रोजी सामुदायिक रजा टाकुन धरणे आंदोलन, ३१ ऑगस्ट २०१९ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप (यादिवशी कर्मचारी रक्तदान करुन शासनाचा निषेध करणार आहेत) आणि ५ सप्टेंबर पासुन पुढे बेमुदत संप करण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य महसुल अधिकारी कर्मचारी संघटनेचे सत्यवान माळवे, स्वप्निल प्रभु, अशोक पोळ, परमेश्वर फड,संदिप हांगे, नायब तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, नायब तहसिलदार संजय गवस यांनी दिली.
महसूल कर्मचाऱ्यांचे उद्यापासून सामूहिक रजा आंदोलन संघटनेचा इशारा: मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे टप्प्याटप्प्याने आंदोलन
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES