राजाराम म्हात्रे:गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासनाकडून निर्णय
सावंतवाडी/शुभम धुरी
आंबोली घाटात आजपासून रात्रीची वाहतूक सुरू करण्यात आली आहे टेम्पो ट्रक आदी जीवनावश्यक वस्तू वाहतूक करणाऱ्या वाहनांबरोबर दुचाकी व चारचाकी चालकांना रात्रीची प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे.याबाबतची माहिती सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.
गणेश चतुर्थी तोंडावर आलेली असताना जीवनावश्यक वस्तू वाहतुकीस अडथळा येऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक महसूलच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत एकेरी मार्ग सुरू असला तरी कोणताही धोका नाही असा दावा श्री म्हात्रे यांनी केला.
त्यांनी याबाबतची माहिती ब्रेकिंग मालवणीला दिली. “ते म्हणाले गेल्या काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे आंबोली घाट सोळा ते सतरा दिवस बंद होता. मुख्य धबधब्याच्या ठिकाणी रस्ता खचल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र आता एकेरी वाहतूक, एसटी वाहतूक सुरू झाली आहे .परंतु रात्रीची वाहतूक सुरू करण्यात यावी अशी लोकांची मागणी होती.काही दिवसावर गणेश चतुर्थी ठेवल्यामुळे आज रात्रीपासून ही वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.