तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी डी. व्ही. तेली तर उपाध्यक्षपदी डी. सी. ठाकूर यांची निवड…

2

मालवण, ता. २७ : मालवण तालुका तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी डी. व्ही. तेली तर उपाध्यक्षपदी डी. सी. ठाकूर यांची निवड करण्यात आली.
संघटनेची उर्वरित कार्यकारिणी अशी- सचिव- डी. आर. सावंत, खजिनदार- डी. व्ही. शिंग्रे, सदस्य- व्ही. एस. कदम, जी. जी. कोकरे, सी. एम. कांबळी, एन. एस. नारकर, सल्लागार- आर. व्ही. निपाणीकर, के. एस. पोकळे, एम. पी. पारकर
मालवण तालुका तलाठी संघटनेची बैठक मालवण मंडळ अधिकारी कार्यालयात आज झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर संघटनेची कार्यकारिणी निश्‍चित करण्यात आली. श्री. तेली यांनी तालुक्यातील सर्व तलाठी बांधवांच्या हितासाठी आणि समस्या सोडविण्यासाठी आपण कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट केले.

4