Thursday, October 10, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावर्षाअखेर जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल करणार दीपक केसरकर: तळवडे...

वर्षाअखेर जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल करणार दीपक केसरकर: तळवडे शाळेच्या नवीन इमारतीसाठी निधी देण्याचे आश्वासन

सावंतवाडी ता.२८: या वर्षाच्या अखेरीपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल करू असा विश्वास पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज तळवडे येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला.तळवडे शाळेच्या नव्या इमारतीसाठी आवश्यक असलेला प्रस्ताव आपल्याकडे सादर करा,तो तात्काळ मंजूर केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
तळवडे येथील जिल्हा परिषद शाळा नं. २ डिजिटल करण्यात आली.या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री.केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, जिल्हाप्रमुख संजय पडते,गटविकास अधिकारी गजानन भोसले सामाजिक कार्यकर्ते रवी परब,जालिंदर परब,
तळवडे अर्बन बँकेचे चेअरमन विलास परब,व्यवस्थापक विनोद वराडकर,मधुकर सावंत,रघुनाथ गावडे,महेश परब,रोहित परब,रवींद्र काजरेकर,आनंद बुगडे,श्याम कुंभार,गजानन जाधव,अनिल जाधव,केशव परब आदी उपस्थित होते.
श्री.केसरकर पुढे म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती करण्याच्या उद्देशाने आमचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल होणे गरजेचे आहे येणाऱ्या या काळात वर्षाच्या अखेरपर्यंत सर्वच्या सर्व शाळा डिजिटल करण्याचा आमचा मानस आहे मुलांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आमचे प्रयत्न आहेत विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना अडचणीवर मात करणे गरजेचे आहे यावी श्री पेडणेकर म्हणाले डिजिटल शाळेच्या माध्यमातून देण्यात येणारे शिक्षण विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे त्याचा फायदा निश्चितच भविष्यात होणार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments