बांदा-सटमटवाडी येथे अवैध दारू वाहतूक रोखली…

447
2
Google search engine
Google search engine

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त….

सिंधुदुर्गनगरी ता.२८: राज्य उत्पादन शुक्ल विभागाच्या ओरोस भरारी पथकाने मुंबई गोवा महामार्गावर बांदा सटमटवाडी येथे रात्री (बुधवार २७ ऑगस्ट) गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतूकिवर केलेल्या कारवाईत ३ लाख ४९ हजार २०० रूपयांच्या अवैध दारू सह एकूण १३ लाख ४९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर बिगरपरवाना गोवा बनावटीची अवैधरित्या वाहतूक केल्या प्रकरणी चंद्रकांत संभाजी ओहोळ (४०) रा. पिंपरी, अहमदनगर याला ताब्यात घेण्यात आले आहे.
मुंबई गोवा महामार्गावरून अवैध गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापुर उपायुक्त व सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ओरोस येथील भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक सत्यवान भगत, दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे, आर. डी. ठाकुुुुर, दिपक वायदंडे, यु एस थोरात, आर एस शिंदे यांच्या टीमने बुधवारी रात्रीपासून बांदा सटमटवाडी येथे महामार्गावर
सापळारचला होता. त्यानुसार रात्री या पथकाने बांदा सटमटवाडी धाब्यासमोर महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ एसथ्री कार (एम.एच. १६ बीझेड ७०५३) या कारला या पथकाने थांबण्याचा ईशारा करत ही गाडी तपासली असता गाडीमध्ये ९६ हजार रूपये किंमतीचे मॅगडॉल नं १ चे १२ बॉक्स, २५ हजार २०० रूपये किमतीचे मॅगडॉल नं १ व्हिस्कीचे ३ बॉक्स, ३६ हजार रूपये किंमतीचे मॅगडॉल सेलिब्रेशन रमचे ५ बॉक्स, २४ हजार रूपये किंमतीचे ऑफिसर चॉइज व्हिस्कीचे २ बॉक्स, ४८ हजार रूपये किंमतीचे गोल्डन एसब्यू फाइन व्हिस्कीचे ८ बॉक्स असे एकूण ३ लाख ४९ हजार २०० रूपये किमतीचे अवैध गोवा बनावटी दारूचे ३० बॉक्स आढळून आले. त्यामुळे ही गोवा बनावटीची अवैध दारू आणि अवैध दारू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली १० लाखाची स्कॉर्पिओ कार असा एकूण १३ लाख ४९ हजार २०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच गोवा बनावटीची बिगर परवाना अवैध दारू वाहतूक केल्या प्रकरणी कार चालक चंद्रकांत संभाजी ओहोळ रा. पिंपरी जि. अहमदनगर याला ताब्यात घेण्यात आले आहे.