साळेल तंटामुक्त समिती अध्यक्षपदी उदय गावडे

2

सिंधुदुर्गनगरी.ता,२८: मालवण तालुक्यातील साळेल गावची वार्षीक सर्वसाधारण सभा २७ ऑगस्ट २०१९ रोजी होवून उदय विष्णु गावडे यांची साळेल महात्मागांधी तंटा मुक्त समितीच्या अध्यक्ष पदी त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी गेल्या तिन वर्षात माजी अध्यक्ष वसंत तथा गणपत पडवळ यांनी चांगल्या प्रकारे कार्य केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच तथा पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, सरपंच सौ साक्षी जाधव, उपसरपंच रविंद्र साळकर, सदस्य लक्ष्मण तथा नाना परब, सौ रश्मि पोफळे, सौ पुजा साळकर, पोलीस पाटील रविंद्र गावड़े, तसेच रोशन गावडे, रविंद्र परब, संतोष गावडे, गणेश गावडे, भुषण गावडे, जनार्दन धनावडे, सौ अश्विनी सुकाळे, मुख्याध्यापिका शुभदा आपटे आणि ग्रामस्थ तसेच महात्मागांधी तंटामुक्त समिती सदस्य आणि बचतगट प्रतीनिधी मोठ्या संखेने उपस्थितीती होते.
ग्राम सेवकाचा संप असल्याने ते अनुपस्थित होते. श्रीमती ज्योती जाधव यांचे अध्यक्षतेखाली कामकाज करण्यात आले.

0

4