सिंधुदुर्गनगरी.ता,२८: दोडामार्ग तालूक्यातील पुरग्रस्तांना कुडाळ तालूक्यातील पडवे गावातील ग्रामस्थांच्यावतीने ४० हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.
४ ते ८, ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवुष्टीमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली होती. सर्वत्र पावसाने हाहाकार माजविला होता. जिल्हयातील सुमारे ३० ते ४० गावांचा पूराच्या पाण्यामुळे संपर्क तुटला होता. जनजिवन विस्कळीत झाले होते. घरांमध्ये आणि घराभोवती पाणी साचले होते.
जिल्ह्यातील जनतेला एक माणूसकिचा हात म्हणून आपणही या नागरीकांचे काहीतरी देणे लागतो या विचाराने कुडाळ तालूक्यातील पडवे गावच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत पडवे कार्यालयाच्या सभागृहात स्व:ताच्या आर्थिक परिस्थितीच्याप्रमाणे थोडी थोडी जिवनावश्यक वंस्तूच्या साहित्यांची जमवा जमव करण्यास सुरुवात केली. बघता बघता सूमारे ४० हजार रुपयांचे जीवनावश्यक साहित्य जमा झाले. यात तांदूळ, डाळ, तेल, टूथपेस्ट, साबण, आटा यांचा समावेश असून हे साहित्य पुरग्रस्त गावातील ग्रामस्थांना पडवे ग्रामस्थांच्यावतीने वाटप करण्यात आले. यावेळी पडवे सरपंच सूभाष दळवी, उपसरपंच सिताराम पारकर, सदस्य सुरेश बोभाटे, अपर्णा मडवळ, बाबूराव गावडे, समिक्षा पडवळ ,सखाराम ( पांडू) परब, योगेश बोभाटे, गोविंद परब, संजय कदम, संतोष सुर्वे, रामच्ंद्र नाईक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळ-: दोडामार्ग तालुक्यातील पुरग्रस्तांना जीवनावश्यक सहित्याचे वाटप करताना पडवे ग्रामस्थ