सुरक्षारक्षक केंद्रामुळे सावंतवाडीला गतवैभव प्राप्त होईल… दीपक केसरकर;बांदा आणि कुडाळ दोन नवीन पोलीस ठाण्याची घोषणा…

366
2
Google search engine
Google search engine

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=6q0K12zwqb8[/embedyt]

सावंतवाडी ता.२८: येथे उभारण्यात आलेल्या सुरक्षारक्षक केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यासह राज्यातील अनेक बेरोजगार युवकांना न्याय मिळेल.त्यामुळे आपोआप सावंतवाडी शहराची गतवैभव पुन्हा प्राप्त होईल ,असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित कार्यक्रमात केले दरम्यान येत्या काळात कुडाळ,बांदा येथे नव्याने पोलीस ठाणी उभारण्यात येणार आहेत.त्याच परिसरात खास हॉस्टेलची उभारणी करण्यात येणार आहे त्यामुळे भविष्यात पोलिसांना याचा लाभ होणार आहे.असेही श्री.केसरकर यांनी सांगितले.
राज्यातील पहिल्या सुरक्षारक्षक प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन येथील पोलीस परेड ग्राउंड वर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते आज झाले.यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत,आमदार नितेश राणे,जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे,जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजू लक्ष्मी ,राज्य सुरक्षा महामंडळ व्यवस्थापकीय संचालक डी कनकरत्नम, पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, डीआयजी जय जाधव, सभापती पंकज पेडणेकर,उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर,वेंगुर्ला उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ,शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते,तहसीलदार राजाराम म्हात्रे ,बांधकाम अभियंता युवराज देसाई आदी उपस्थित होते.
केसरकर म्हणाले सिंधुदुर्गाच्या विकासाला चालना देणारा हा महत्त्वाचा टप्पा असून प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून येथील मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहेत.या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतलेले प्रशिक्षणार्थी पोलीस दलाला पुरतेच मर्यादित राहणार नसून त्यांना भविष्यात सैन्य दलातही संधी त्यामुळे येत्या आठ दिवसात या ठिकाणी प्रशिक्षण देण्यातस सुरवात होणार आहे.
केसरकर म्हणाले पोलिसांना स्वतःच्या मालकीची घरे असावी यासाठी गृहखातं मोठा कार्यक्रम महाराष्ट्रात रावेत आहे.त्याचबरोबर पोलीस स्टेशनच्या ठिकाणी हॉस्टेल उभारण्यात येणार आहे तर राज्यातील पाच धार्मिक पर्यटन स्थळावर टुरिझम पोलीस निर्माण करण्यात येत आह तर तर इतर गृहराज्यमंत्र्यांनी न केलेली कामगिरी या वेळी तुम्हाला कोकणात दिसून येईल असे आशाही त्यांनी व्यक्त केली.