जिल्हा परिषद चे कर्मचारी उमेश गुरव यांचे निधन

2

सिंधुदुर्गनगरी.ता,२८: जिल्हा परिषदेचे कर्मचारी उमेश रामचंद्र गुरव यांचे बुधवारी सकाळी कुडाळ येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेताना निधन झाले. त्यांच्या पश्चात् आई, पत्नी, एक महिन्याच्या आतील वयाचा मुलगा व अविवाहित एक भाऊ असा परिवार आहे.
उमेश गुरव हे वडिलांचे निधन झाल्याने ३ मे २००३ रोजी अनुकंपाखाली जिल्हा परिषद सेवेत रुजू झाले होते. ते सध्या जिल्हा परिषदेत बांधकाम विभागात चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांचे मुळ गाव कुडाळ तालुक्यातील गिरगांव हे असून सध्या ते कुडाळ कविलकाटा येथे वस्तव्यास होते. लग्न होवून दहा वर्षानंतर त्यांना मुलगा झाला होता. त्याचे वय एक महिन्याचे आत आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांना ह्रदय विकाराचा झटका आला होता. कुडाळ येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेताना त्यांची बुधवारी प्राणज्योत मालवली. उमेश गुरव यांच्या निधनाने जिल्हा परिषद कर्मचारी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे.

1

4