सावंतवाडी विधानसभा मतदार संघ भाजपा स्वबळावर लढवणार …… महेश सारंग :राणेंना घेण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींचा, राजन तेली …

2

सावंतवाडी ता.२८: आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघ आम्ही स्वबळावर लढवणार आहोत.तसे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत.त्या दृष्टीने काम सुरू आहे.आज नव्याने कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.असा दावा भाजपाचे तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी आज येथे केला.
यावेळी नारायण राणे यांच्याबाबत कोणता निर्णय घ्यायचा याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत.त्यामुळे आता आम्ही काही बोलू शकत नाही.पक्ष देईल तो आम्हाला मान्य असेल,असे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी सांगितले.भाजपाची तालुका कार्यकारिणीची बैठक आज येथे झाली त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोघे बोलत होते.
यावेळी श्री .सारंग म्हणाले आज झालेल्या बैठकीत सावंतवाडीची जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे .त्यादृष्टीने आवश्यक असलेले आदेश आम्हाला पक्षाकडून कालच प्राप्त झाले आहेत.त्यानुसार आता पुढची मोर्चेबांधणी सुरू आहे.त्यामुळे ज्या पक्षात जी पदे रिक्त होती. ती पदे भरण्यात आली. त्याचा अन्य प्रवेशाची कोणताही संबंध नाही येणाऱ्या काळात निश्चितच भाजपला चांगले दिवस येतील पक्ष वाढण्यास मदत होईल.
यावेळी परिणीता वर्तन धनश्री गावकर उमेश साटेलकर

15

4