संगणक परिचालकांचे एक दिवसीय आंदोलन…

169
2

पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे: विविध मागण्यांसाठी आवाज…

वेंगुर्ले ता.२८:’आपले सरकार केंद्रात’ काम करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी. महामंडळात परिचालक म्हणून कायमस्वरूपी सामावून घ्यावे. यासह अन्य मागण्यांसाठी वेंगुर्ला तालुक्यातील सर्व संगणक परिचालकांनी पंचायत समिती वेंगुर्ला कार्यालयासमोर आज बुधवारी एक दिवसाचं ‘धरणे आंदोलन’ केलं.
आठ वर्षापासून आपले सरकार सेवा केंद्र मध्ये काम करणाऱ्या संगणक परीचालकांचे महिनोन महिने मानधन मिळत नाही. शासनाने वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी संगणक परिचालक राज्यातील प्रत्येक पंचायत समिती कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन केले. या धरणे आंदोलनातील प्रमुख मागण्या मध्ये
राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती संगणक परिचालक यांना महाराष्ट्र आय.टी. मंडळ यामध्ये समावेश घेऊन सर्व संगणक परिचालक त्यांना यामध्ये कायमस्वरूपी नियुक्ती देणे., सर्व संगणक परिचालकांना राज्याच्या निधीतून किमान मासिक वेतन १५ हजार रुपये देणे, सर्व संगणक परिचालकांचे जुलै २०१९ पर्यंतचे सर्व थकीत वेतन मानधन देणे या मागण्यासाठी सर्व संगणक परिचालक धरणे आंदोलन करत असून या आंदोलनाला वेंगुर्ला पंचायत समिती सभापती सुनील मोरजकर, गटविकास अधिकारी श्रीमती उमा पाटील, विस्तार अधिकारी भास्कर केरवडेकर, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष गणेश बागायतकर, उपाध्यक्ष अनिल चव्हाण आणि त्यांचे सहकारी यांनी तसेच तालुका समन्वयक गणेश अंधारी यांनी सुद्धा भेट देऊन आपला पाठिंबा व्यक्त केला.
सदर धरणे आंदोलनात मयुरेश अंकुश मांजरेकर ग्रामपंचायत आडेली, सुधाकर अनंत धोंड ग्रामपंचायत वायंगणी/खानोली, रघुनाथ अनंत जुवाटकर ग्रामपंचायत म्हापण, सुनिता रामदास आरोलकर ग्रामपंचायत उभादांडा, अस्मिता अमित नाईक ग्रामपंचायत होडावडा, वामन रघुवीर मडकईकर ग्रामपंचायत केळुस, शांताराम नामदेव मुळीक ग्रामपंचायत आसोली, योगिता सुरेश परब ग्रामपंचायत शिरोडा, पूर्वा लक्ष्मण कांदे ग्रामपंचायत वजराठ, रूपाली भिवा गावडे ग्रामपंचायत मठ, दिप्ती उदय धुरी ग्रामपंचायत वेतोरे, सुप्रिया सुधाकर ठुंबरे ग्रामपंचायत तुळस, आरती सदाशिव पडते ग्रामपंचायत मेढा, प्रियांका रंगनाथ केळुसकर ग्रामपंचायत परबवाडा, पूजा हनुमंत वराडकर ग्रामपंचायत मातोंड/ पेंडूर या परीचारांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

4