दाभोली निमुसगा येथे वळणावरील कुंपणावर आढळला मृतदेह
वेंगुर्ले : ता.२८: वेंगुर्ले-दाभोली मार्गावरील निमुसगा येथील वळणावर रस्त्याच्या बाजूला कुंपणावर आज दुपारी एका महिलेचा मृतदेह आढळूण आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनाना करुन मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान सदर मृतदेह हा वेतोरा-पालकरवाडी येथील सत्यभामा कृष्णा कारंगूटकर (५५) यांचा असल्याचे निष्पन्न झाले असुन पोलिसांनी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
पालकरवाडी येथील सत्यभामा करंगुटकर यांचे मानसिक संतुलन बिघडलेले होते. नवऱ्याच्या निधनानंतर गेली सात-आठ वर्षे ती एकटीच घरात रहात असे. तीचा पुतण्या संजय करंगुटकर हा तीला जेवण वगैरे देऊन तीची काळजी घेत असे. शनिवार २४ तारीखला ती घरातून बाहेर पडली ती घरी परतलीच नाही. तीचा शोध सगळीकडे सुरु होता. दरम्यान आज दुपारी दाभोली-निमुसगा येथील वळणावरील कुंपणावर ती मयत स्थितीत दिसून आली. पोलीसपाटील जनार्धन पेडणेकर यांना ही माहिती मिळताच त्यांनी वेंगुर्ले पोलिसांना हि माहिती दिली. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पंचनामा करून ताब्यात घेतला. आणि शवविच्छेदन करून पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास पो.हे.कॉ. जाधव करीत आहेत.