Sunday, January 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यागोव्यातील भूगर्भशास्त्रज्ञांकडून असनिये व शिरर्शिंगे मधील दरडींचे सर्वेक्षण...लखमराजे भोसलेंनी शब्द पाळला :याबाबतचा...

गोव्यातील भूगर्भशास्त्रज्ञांकडून असनिये व शिरर्शिंगे मधील दरडींचे सर्वेक्षण…लखमराजे भोसलेंनी शब्द पाळला :याबाबतचा अहवाल शासनाला कळवणार…

ओटवणे ता.२८
असनिये व शिरशिंगे येथील धोकादायक डोंगरांचे तज्ञ भूगर्भ शास्त्रज्ञाकडून सखोल सेर्वेक्षण करण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊ,हा शब्द सावंतवाडी सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमंत लखमराजे भोसले यांनी खरा करून दाखवला.बुधवारी श्रीमंत लखमराजे भोसले यांच्या पुढाकाराने गोवा येथील भूगर्भ विभागाचे तज्ञ प्रा. पूर्णानंद सवईकर व प्रा.अस्मिता हळदणकर यांनी असनिये व शिरशिंगे येथील धोकादायक डोंगरांची पाहणी केली.यावेळी सावंतवाडी संस्थानचे महाराज श्रीमंत खेमसावंत भोसले उपस्थित होते. असनिये व शिरशिंगे येथील डोंगर सुरक्षित राहण्यासाठी भविष्यात कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत शासनाला अहवाल देण्यात येईल,असे प्रा.सवईकर व प्रा.अस्मिता हळदणकर यांनी यावेळी सांगितले.
सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमंत लखमराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी असनिये येथे कोसळलेल्या दरडींची तसेच शिरशिंगे येथे भूगर्भाला गेलेल्या तड्यांची पाहणी केली होती.असनिये व शिरशिंगे येथील डोंगरांची राज्य शासनाच्या भूगर्भ तज्ज्ञांनी याची पाहणी केली होती.मात्र हे डोंगर व डोंगरा लगतची लोकवस्ती कशी सुरक्षित राहील व त्यासाठी कोणती उपाययोजना करता येईल,त्यासाठी शिरशिंगे,असनिये येथील धोकादायक डोंगरांचे तज्ञ भूगर्भ शास्त्रज्ञाकडून सखोल सेर्वेक्षण करण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार घेऊ,असा शब्द श्रीमंत लखमराजे भोसले यांनी दिला होता.हा शब्द खरा करत युवराज लखमराजे यांनी आजही आपल्या जनतेप्रती असलेली आपुलकी दाखवून दिली.
बुधवारी गोवा येथील भूगर्भ विभागाचे तज्ञ प्रा. पूर्णानंद सवईकर व प्रा.अस्मिता हळदणकर यांनी असनिये व शिरशिंगे येथील धोकादायक डोंगरांची पाहणी केली.शिरशिंगे व असनिये येथे घडलेल्या भूस्खलनाचे प्रकार भिन्न आहेत.शिरशिंगे येथे जमिनीच्या खाली उभी भेग गेल्याने हा भाग संवेदनशील बनला आहे.मात्र तेथील लोकांचे पुनवर्सन करण्याऐवजी काही ठोस उपाययोजना करून हा परिसर सुरक्षित बनविला जाऊ शकतो,तर असनिये येथील भूस्खलनामुळे केवळ रस्त्याला धोका निर्माण झाला आहे.रस्ता व नजीकचा परिसर सुरक्षित राहण्यासाठी येथील दरड हटविण्याचे काम योग्यपणे केल्यास येथे भविष्यात धोका निर्माण होणार नाही. शिरशिंगे व असनिये येथील भूस्खलनाबाबत शासनाला अभिप्राय कळविला जाणार असल्याचे प्रा.सवईकर व प्रा.अस्मिता हळदणकर यांनी सांगितले.यावेळी सावंतवाडी संस्थानचे महाराज श्रीमंत खेमसावंत भोसले,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा उर्फ वसंत केसरकर, संजय सावंत,आनंद ठिकार,नारायण ठिकार,उमेश ठिकार,आपा सावंत,विजय सावंत,अभिमन्यू सावंत तसेच ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments