मुलांनी खाऊचे पैसे दिले सैनिकांसाठी…. दहा हजाराची रक्कम जमा:वेतोरेच्या ज्ञानदा शिशूवाटीकेच्या चिमुरड्यांचा आदर्श…

2

वेंगुर्ले ता.२८:  सैनिक हो तुमच्यासाठी… या उपक्रमात वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथील ज्ञानदा शिशुवाटीकेतील मुलांनी आपल्या खाऊचे पैसे जमवित सैनिकांसाठी एकूण १० हजार  ५७५ एवढी रक्कम जमविली आहे. सदरची रक्कम ही लवकरच सैन्यदलाच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
वेतोरे येथील विद्याभारती संचलित ज्ञानदा शिशुवाटीकेमध्ये मार्च महिन्यापासून सैनिक हो तुमच्यासाठी हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला होता. उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, मी माझे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून माज्या खाऊचे, बक्षिसाचे व इतर मिळकती मधील जेवढे शक्य होतील तेवढे पैसे दान स्वरुपात देण्याची शपथ घेतली होती. या उपक्रमात निधी जमा करण्यासाठी प्रत्येक मुलाला शाळेतर्फे फंडपेटी दिली होती. गेल्या सहा महिन्यात मुलांनी या फंडपेटीच्या माध्यमातून सुमारे १० हजार ५७५ एवढी रक्कम जमा केली. सदरची रक्कम मुलांनी १४ आॅगस्ट रोजी शाळेच्या संचालिका कांचन दामले यांच्याकडे सुपूर्द केली. मुलांनी जमा केलेली ही रक्कम लवकरच सैन्यदलाच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. बालवयात देशभक्तीचे असे बिज रुजविण्याचा कांचन दामले यांच्या या उपक्रमाबाबत सर्वत्र कौतुक होत आहे.

0

4