_वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालयाचे उपक्रमशिल शिक्षक संदीप शिंदे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर_

2

वैभववाडी.ता,२९: महाराष्ट्र शासनाचा मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या हस्ते दिला जाणारा राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ अर्जुन रावराणे विद्यालयाचे उपक्रमशिल शिक्षक संदीप बळवंत शिंदे यांना जाहीर झाला आहे.
सन २०१८/१९ च्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शासनाने शालेय व क्रीडा विभाग स्तरावर १०७ शिक्षकांची निवड केली होती. यात सिंधुदुर्गातून अर्जुन रावराणे विद्यालयाचे उपक्रमशिल शिक्षक संदीप शिंदे यांना जाहीर झाला आहे. श्री. शिंदे १७ वर्षे पर्यवेक्षक पदावर कार्यरत आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे वैभववाडी तालुका केंद्र संयोजक म्हणून कार्यरत आहेत. तसेच अध्यक्ष तालुका गणित मंडळ, अध्यापक संघ अध्यक्ष या पदांवर ते कार्यरत आहेत. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

19

4