भाजपा आणि माजी आमदार राजन तेली यांचा संकल्प…
वेंगुर्ले ता.२९: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत कॅशलेस आरोग्य विमाकवच देण्यात आले आहे.या योजनेचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ व्हावा व ही योजना तळागाळापर्यंत पोहचावी या द्रुष्टीने भारतीय जनता पक्षाच्या वतीने या योजनेची कार्ड मोफत बनवुन देण्याचा संकल्प माजी आम. व भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी केला आहे.
या योजनेची जनजागृती व्हावी म्हणून वेंगुर्ले नगरपरिषद हाॅल मध्ये या योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा आयोजित केला होता . यावेळी व्यासपीठावर माजी आम. राजन तेली , नगराध्यक्ष राजन गिरप , तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई , नगरसेवक प्रशांत आपटे , मच्छिमार नेते भाई मालवणकर , माजी नगरसेवक सुरेश भोसले उपस्थित होते.
यावेळी या योजनेची माहिती देताना माजी आम. राजन तेली म्हणाले की आपल्या देशात प्रत्येक कुटुंबाचा सर्वाधिक खर्च वैद्यकीय उपचारासाठी होतो . ही चिंताजनक बाब आहे . जनतेचा हा भार कमी करण्यासाठी मोदी सरकारने आरोग्यावर केल्या जाणारया तरतुदी मध्ये वाढ केली आहे . आयुष्यमान भारत योजने अंतर्गत सन 2022 पर्यंत देशभरात दीड लाख आरोग्य केंद्र सुरू केली जाणार आहेत . त्याद्वारे नागरिकांना त्यांच्या घराजवळ प्राथमिक उपचारांची सुविधा मिळु शकणार आहे . प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ 50 कोटी गरीब नागरिकांनी घेतला आहे . ही योजना सुरू झाल्यानंतर पहिल्या दहा आठवड्यात पाच लाख कुटुंबाना 700 कोटी रुपयांचे मोफत उपचार पुरविण्यात आले आहेत . या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांना फायदा व्हावा म्हणूनच या योजनेची कार्ड भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोफत बनवुन देणार असल्याचे सांगितले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले . या कार्यक्रमात वेंगुर्ले शहरातील ३५० लाभार्थी उपस्थित होते.