सावंतवाडी तालुका वीज बिलांच्या वसूलीत जिल्ह्यात मागे..

251
2
Google search engine
Google search engine

दोन कोटी रूपये देणे:वसूलीचा ठपका ठेवून अधिका-यांचे पगार कापले…

सावंतवाडी/अमोल टेंबकर,ता.२९: जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सावंतवाडी तालुका वीज बिलाच्या वसुलीत मागे राहिला आहे.सव्वा चार कोटी वीजबिलांच्या रक्कमेपैकी फक्त दोन कोटी रुपये वसूल झाले आहेत.त्यामुळे याचा ठपका ठेवून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सावंतवाडीच्या वीज वितरण अधिकाऱ्यांचे पगार कापले आहेत.
याबाबत वीज विभागाचे उपकार्यकारी अभियंता भालचंद्र कुलकर्णी यांनी दुजोरा दिला,असून सावंतवाडीत अशा प्रकारे पहिल्यांदाच वसूली तटल्याचे त्यांनी सांगितले.राज्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्हा विज चोरी,वीज गळती अशा गोष्टीत कधी चर्चेत आला नाही.जिल्ह्यातील वीज ग्राहक आपली वीज बिले वेळेवर भरत असल्यामुळे तसेच वीज चोरी नसल्यामुळे याठिकाणी भारनियमन सुध्दा काही प्रमाणात शिथिल करण्यात आले होते.
या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील थकित वीज बिलाचा आकडा कधी फुगण्याची शक्यता नव्हती.दरम्यान या महिन्यात मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच सावंतवाडी तालुक्याची वसुली झालेली नाही.सव्वाचार कोटी पैकी फक्त दोन कोटी रुपये ग्राहकांकडुन भरण्यात आले आहेत.त्यामुळे या थकीत रकमेचा ठपका ठेवून अधिकार्‍यांचे पगार कापण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आहे.