सावंतवाडी.ता,२९: दोनशे किलोमीटर सायकलची रॅली काढत सावंतवाडी ते संकेश्वर आणी तेथून परत असा प्रवास साडेतेरा तासात पूर्ण करण्याचे आव्हान जिल्ह्यातील डॉक्टरनी पेलले आहे.
या अनोख्या उपक्रमात त्यांनी सहभाग दर्शवून एक वेगळा प्रयोग केला आहे. कोकण रेडॉन इयर्स या संस्थेच्यावतीने प्रमुख पुष्कळ कशाळीकर यांच्या या संकल्पनेतून या वेगळ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीच्या नियमानुसार सायकल रॅली स्पर्धकांनी कोणत्याही मदतीशिवाय पूर्ण करायचे असते. तसेच वाटेत सायकल पंचर किंवा नादुरुस्त झाल्यास सायकल ची दुरुस्ती स्पर्धकाने स्वतः करायचे असते. या सर्व आव्हानांना पार करू सावंतवाडीतील डॉक्टरने हा उपक्रम यशस्वी केला आहे. यात सावंतवाडीतील प्रथितयश डॉक्टर्स धीरज सावंत, मिलिंद खानोलकर, स्नेहल गोवेकर, सुबोधन कशाळीकर तसेच चंद्रकांत खोत, जयेश स्वार, गोव्यातील श्री. समीर नाडकर्णी, प्लँसिड फर्नांडिस, ओंकार जोग, मोहनीश टिळवे, मुंबई चे संदीप कोरगावकर यांनी रँलीत सहभाग घेतला.
सावंतवाडीतील डॉक्टरांची अनोखी सायकल रॅली…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES