माझा सी-वर्ल्डला विरोध नाही जमीन संपादन करण्यास विरोध
सिंधुदुर्गनगरी.ता,२९: मालवण तालुक्यातील वायंगणी-तोंडवळी येथील प्रस्तावित सी-वर्ल्ड प्रकल्प उभारण्याची पुणे येथील ज्या कंपनीने जबाबदारी घेतली होती. ती कंपनी बोगस निघाली असून तिने येथील गाशा गुंडाळला आहे, असा गौफ्य स्फोट करतानाच माझा या प्रकल्पाला विरोध नाही. पण हा प्रकल्प खाजगी व्यक्ति किंवा समूह उभारणार असल्याने जमिनींचे भुसंपादन करण्यास विरोध आहे, अशी माहिती आ वैभव नाईक यांनी दिली.
जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात सी-वल्ड संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. १३०० एकर जमिनीमध्ये होणारा हा प्रकल्प आम्ही ३५० एकरवर आणला. हा प्रकल्प व्हावा, अशी माझ्यासह तेथील जनतेची इच्छा आहे. पूर्वीच्या सरकारने या प्रकल्पासाठी लागणारी जमीन संपादित करण्यासाठी १०० कोटी रूपये मंजूर केले होते. पण हा प्रकल्प तीन हजार कोटींचा आहे. तो खाजगीरित्या उभारला जाणार आहे. शासन उभारत नाही. त्यामुळे या प्रकल्पासाठी लागणारी जमीन संपादित करण्यास माझा विरोध आहे. जो पर्यंत प्रकल्प उभारणारी कंपनी निश्चित होत नाही. तोपर्यंत जमीनी संपादन करून काय उपयोग ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=oGvUmmAVDUc[/embedyt]
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=9ErxP4UvtNQ[/embedyt]