लंगडी, दोरी उड्या, लगोरी सारखे पारंपरिक खेळ महाराष्ट्रातील शाळांमध्ये रंगणार…

257
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पुणे.ता,२९: महाराष्ट्रातील पारंपारिक परंतु शाळांमध्ये खेळायला बंदी असलेले चाळीस खेळ शाळेत पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी पुण्यातील खराडी येथे केली. पारंपरिक खेळांमध्ये आनंद तर मिळतोच शिवाय एकाग्रता आणि शारीरिक क्षमताही वाढते. त्यामुळे हा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात हा कार्यक्रम खराडी येथील पुणे महानगरपालिकेच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना दूरचित्रवाहिनीवर दाखविण्यात आला. शालेय शिक्षण व क्रीडामंत्री अशिष शेलार यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते.वडगाव शेरीचे आमदार जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी मीनाक्षी राऊत, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी एम आर जाधव, संतोष भरणे, अनिल जावळकर , नगर रस्ता भागातील मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
शेलार म्हणाले, नव्या पिढीने व्हिडिओ गेम न खेळता पारंपारिक भारतीय खेळ खेळावेत. आमच्या पिढीचे लहानपण हे जुने खेळ खेळण्यात गेले. नव्या पिढीला या खेळाचा परिचय व्हावा आणि आनंद मिळावा हा यामागील उद्देश आहे. लंगडी, दोरी उड्या, लिंगोरचा खेळ यापुढे शाळांमध्ये घेतले जातील. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.
९३ शिक्षकांचे निवेदन राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सेवेत कायम करण्याचे आदेश दोन वर्षांपूर्वी दिला आहे. मात्र तो निर्णय नगरविकास खात्याकडे अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे हे शिक्षक गेली दहा वर्ष फक्त सहा हजार रुपये मानधनावर काम करत आहेत. त्यामुळे या ९३ शिक्षकांनी शिक्षण मंत्र्यांना निवेदन देऊन सेवेत कायम करण्याची मागणी केली.

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=oGvUmmAVDUc[/embedyt]

\