अनेक वर्ष पदे होती रिक्त:रखडलेल्या प्रश्नांना फुटणार वाचा…
सिंधुनगरी,ता.२९: जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या सिंधुनगरी नवनगर विकास प्राधिकरण समितीवर अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा दोन अशासकीय सदस्यांची वर्णी लागली आहे!भाजपाचे जिल्हा सरचिटणीस असलेले प्रभाकर सावंत व शिवसेनेचे युवा नेते महेश उर्फ छोटू पारकर या दोघांची प्राधिकरण सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या समितीवर आता दोन अशासकीय सदस्यांचा समावेश झाल्याने प्राधिकरण क्षेत्रातील अनेक प्रश्नांना आता वाचा फुटू शकेल अशी अपेक्षा आहे!
जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली ते सिंधुनगरी नवनगर प्राधिकरण समिती शासनाने नगरीचा अस्तित्वानंतर निर्माण केली आहे. या समितीवर आठ अधिकारी व दोन अशासकीय सदस्य मिळून दहा सदस्यीय समिती नियुक्त झाली आहे. तत्कालीन अशासकीय सदस्य प्रकाश जैतापकर व अवधूत मालणकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर शासनाने गेली अनेक वर्षे या दोन अशासकीय सदस्यांची निवड केली नव्हती. नुकतेच याबाबतचे राजपत्र प्राप्त झाले असून शासनाने प्रभाकर सावंत व छोटू पारकर या दोन अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली आहे.
राख्यांनी किल्ली प्राधिकरण क्षेत्रातील प्रशासकीय भवनाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची तसेच कर्मचारी वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यांचीही अत्यंत दयनीय अवस्था झाली असून मोठ मोठे खड्डे या रस्त्यावर पडले आहेत. वाहनचालकांसह रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारांना खड्ड्यातील चिखलाचा मोठा सामना करावा लागत आहे. याबाबत प्राधिकरण क्षेत्रातील रहिवाशांनीही प्राधिकरण समितीचे अनेकदा लक्ष वेधले होते. मात्र प्रशासनाने याबाबत दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे. ओरोस फाटा ते जिल्हाधिकारी भवनाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्डे त्यातील चिखलाचे साम्राज्य यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे तसेच प्राधिकरण क्षेत्रातील विकासही ठप्प झाला आहे. मागील काळात रस्त्यावरील डागडुजी ऐवजी प्राधिकरण समितीने रस्त्याच्या मध्ये असलेल्या जागेत गार्डनचा प्रस्ताव आणून त्यावर लाखो रुपयांची उधळपट्टी केली होती. मात्र एका वर्षातच लाखो रुपये खर्चाचे हे गार्डन गायब झाले आहे. हेच पैसे त्या रस्त्यांच्या डागडुजीवर खर्च झाले असते इतर मुख्यालयात येणाऱया नागरिकांसह येथील स्थानिक रहिवाशांची गैरसोय झाली नसती अशाही प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. या प्राधिकरण क्षेत्रातील नगरपंचायतीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून या दोन अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीनंतर नगरपंचायतीच्या कामालाही गती मे अशी अपेक्षा आहे.