आमदार नितेश राणे यांचा नुकसानग्रस्त गावक-यांना दिलासा…
ओटवणे ता.२९: भूस्खलनामुळे स्थलांतरित करण्यात आलेल्या झोळंबे दापटेवाडी येथील आपत्तीग्रस्तांची आ.नितेश राणे गुुरुवारी भेट घेतली.भूगर्भ तज्ज्ञांचा अहवाल आल्यावर ग्रामस्थांच्या मागणीनुसार पुनर्वसनासाठी आपण स्वतः प्रयत्न करू,असे आश्वासन श्री.राणे यांनी दिले.श्री.राणे यांनी भूस्खलनामुळे उध्वस्त झालेल्या बागायतीची व घरांचीही पाहणी केली.
झोळंबे दापटेवाडी येथे डोंगर खचून घरे व बागायती पूर्णपणे उध्वस्त झाली आहे.दापटेवाडी येथील 15 कुटुंबाना तेथील विठ्ठल मंदिरात स्थलांतरित करण्यात आले आहे.गेल्या 22 दिवसांपासून आपले घरदार सोडून मंदिरात आश्रयाला असणाऱ्या या आपत्तीग्रस्तांची आ.नितेश राणे गुुरुवारी भेट घेतली.आमच्या घरामध्ये अद्यापही मातीचे ढिगारे आहेत.आम्ही घरात जाऊ शकत नाही.गेले 22 दिवस आम्ही विठ्ठल मंदिरात राहत आहोत.भूस्खलनाचे कारण स्पष्ट झाले नसल्याने भविष्यात धोका निर्माण होण्याची भीती आहे.त्यामुळे आमचे पुनर्वसन करण्यात यावे अशी व्यथा आपत्तीग्रस्तांनी श्री. राणें यांच्यासमोर मांडली.श्री.राणे यांनी यानंतर जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे चर्चा केली.श्री.पांढरपट्टे यांनी उद्या भूगर्भ तज्ञ पाहणी करतील,त्यानंतर पुढील निर्णय घेऊ,असे स्पष्ट केले.भूगर्भशास्त्रज्ञ पहाणीसाठी येणार असून त्यांच्या अहवालानंतर पुनर्वसनाची तजवीज करू,असे आश्वासन आ. नितेश राणे यांनी आपत्तीग्रस्ताना दिले.यावेळी यावेळी तालुकाध्यक्ष संतोष नानचे,सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब , स्वाभिमान जिल्हाउपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, शैलेश दळवी,जि.प.आरोग्य व शिक्षण सभापती अनिशा दळवी,वेंगुर्ला माजी तालुकाध्यक्ष मनीष दळवी,शहराध्यक्ष दादा बोर्डेकर,नगरसेविका उपमा गावडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते