बांदा-पत्रादेवी सीमेवर उभारण्यात येणाऱ्या प्रवेशद्वाराचे उद्या भूमिपूजन…

2

बांदा ता.२९: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर पर्यटन स्थळा समवेत जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या भागांची माहिती देणाऱ्या प्रवेशद्वाराच्या उभारणीला अखेर मुहूर्त मिळाला आहे.या कामाचे भूमिपूजन उद्या दिनांक ३० रोजी सकाळी १०:३० वाजता पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे.पत्रादेवी-बांदा सीमेवर हा गेट उभारण्यात येणार आहे.
जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना माहिती मिळण्यासाठी हा प्रवेश द्वार उभारण्याचा निर्णय पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला होता.त्यानुसार हा प्रवेश द्वार उभारण्यात येणार आहे.यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

17

4