वेंगुर्ले नारायण तलावाबाबत पाटबंधारे विभागाचा सल्ला घेणार… अभियंता कुलकर्णी:तक्रारदारांसोबत पाहणी दरम्यान दिली माहिती

2

वेंगुर्ले ता.२९ : नारायण तलावाच्या संयुक्तरित्या केलेल्या पहाणीवेळी तलाव दुरुस्ती व पुर्नबांधणी संदर्भात पाटबंधारे विभागाकडून सल्ला घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता श्री.एस. कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या उपलोकायुक्तांनी वेंगुर्ला येथील नारायण तलावाची संयुक्त पहाणी करुन या योजनेतून वेंगुर्ला शहरास सुरळीत पाणीपुरवठा व्हाया या दृष्टीने कोणती उपाययोजना करावी यासंबंधी सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता श्री. एस. कुलकर्णी व तक्रारदार अतुल हुले यांनी संयुक्तरित्या नारायण तलावाची पहाणी केली. यावेळी केलेल्या पहाणीत तलावाच्या उजव्या बाजूच्या भितीचा भाग कोसळला आहे. या संदर्भातील ३१ लाख रुपये वसूलीचे आदेश दिले असून त्यासंबंधीची कार्यवाही सुरु आहे. तसेच दक्षिणेच्या बाजूची भित हे मातीचे धरण आहे. त्याची अनेक वर्षे देखभाल व दुरुस्ती न झाल्याने भितीवर मोठ्या प्रमाणात झाडे उगवली आहेत. त्यांची पाळेमुळे धरणाच्या भितीत गेली असल्याने या भितीमधून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या भिंतीची दुरुस्ती कोणत्याप्रकारे करावयाची याचा सल्ला शासनाच्या पाटबंधारे विभागाकडून घेण्यात येणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल अशी माहीती श्री. कुलकर्णी यांनी दिली. तलावाच्या पहाणी दरम्यान, प्रदिप वेंगुर्लेकर, विवेक कुबल, माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंते उपस्थित होते.

16

4