वेंगुर्ले.ता,२९: तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायत च्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी प्रसाद पाटकर यांची निवड नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत करण्यात आली.
परुळेबाजार ग्रामपंचायत ची तहकूब ग्रामसभा सरपंच श्वेता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनील चव्हाण, संतोष करलकर, मनीषा नेवाळकर, विद्या दाभोलकर, अदिती परुळेकर, प्रणिता तांडेल, माजी सरपंच प्रदीप प्रभू, उदय दाभोलकर, प्राजक्ता चिपकर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वछाता अभियान समिती व तंटामुक्ती समिती निवड करण्यात आली. तसेच मनरेगा आराखडा बाबत माहिती देण्यात आली.