निवडणुकी संदर्भात झाली चर्चा
वेंगुर्ले.ता,२९: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एम.के.गावडे यांनी दोडामार्ग येथे जाऊन पक्षाचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी यांची भेट घेऊन चर्चा केली.
राष्ट्रवादीने होऊ घातलेल्या विधान सभेच्या निवडणूकीच्या अनुशंगाने वेंगुर्ले-सावंतवाडी-दोडामार्ग मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्या दृष्टीने मतदार संघात पक्षाच्या छोट्या सभा, गाठीभेटी कार्यक्रम सुरू आहेत. दरम्यान एम.के.गावडे यांनी श्री दळवी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा नम्रता कुबल, वेंगुर्ले तालुका अध्यक्ष धर्माजी बागकर, जिल्हा बॅंकेचे माजी संचालक नितीन कुबल, तालुका उपाध्यक्ष योगेश कुबल आदी उपस्थित होते. या भेटीमध्ये निवडणुकी संदर्भात चर्चा झाली. तसेच दोडामार्ग तालुक्यात आपल्या पक्षाच्या मागेच जनता उभी राहील असे श्री दळवी यांनी सांगितले.