व्यापाराला मारहाण केल्याप्रकरणी दोघांना जामीन नाकारला

177
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी.ता,२९: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील व्यापा-याचे अपहरण करत त्याला मारझोड करून दागिने व रोख रक्कमेसह 5 लाख 56 हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या उत्तम कामटे (३०), संगमेश बंडू जाधव (३०) दोन्ही रा. निपानी बेळगाव व विजय विलास भोई (२५) कालग कोल्हापुर यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी फेटाळून लावला आहे.
सरकारपक्षातर्फे सरकारी वकील संदेश तायशेटे यांनी काम पाहिले.
याबाबतची हकिगत अशी की, १३ मे रोजी हातकणंगले येथील व्यापारी उमेश वसंतराव पिसे हे गोवा येथून आपल्या घरी इर्टीगा कारने जात होते. आंबोली-बेळगाव मार्गावर सहा आरोपींनी स्काॅरपिओ वाहनाने पिसे यांच्या कारचा पाठलाग करून त्यांची कार अडवली व अपहरण केले. पिसे यांना पिस्तुल दाखवून मारझोड केली. अंगावरील दागिने तसेच रोख रक्कम १ लाख ९० हजार रुपये असा एकूण ५ लाख ५६ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास करत या व्यापा-याला बेळगाव येथे टाकून दरोडेखोर पळून गेले होते. त्यानंतर व्यापारी पिसे यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार स्वप्निल बाळासो गजबर(३२, इचलकरंजी), सुरज नझिर मेहतर(३३, म्हापसा, मुळ रा. सावंतवाडी), उत्तम विष्णू कामटे (३३, निपानी), संगमेश बंडू जाधव(३०,निपानी, विजय विलास भोई(३०, मुरगुड जिल्हा कोल्हापूर) व नितेश नदकुमार नाईक (२९) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनंतर न्यायालयाने या संशयीतांना प्रथम पोलिस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सद्य हे सर्व न्यायालयीन कोठडीत असून या पैकी उत्तम कामटे (३०), संगमेश बंडू जाधव (३०) दोन्ही रा. निपानी बेळगाव व विजय विलास भोई (२५) कालग कोल्हापुर यांनी न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे.

\