फोंडा घाटात ट्रॅक्टर पलटी झाल्याने मध्यरात्रीपासून ट्राफिक जाम

2

कणकवली ता.२९: कोल्हापूर व सांगली-पुणे येथून कोकणात येण्यासाठी एकमेव सुरक्षित फोंडाघाट असताना मध्यरात्री घाटात ट्रॅक्टर पलटी होऊन रस्त्यावर आल्याने मोठ्या गाड्यांची वाहतूक पूर्णता ठप्प झाली आहे.मात्र वाहन चालकांनी सिंधुदुर्ग पोलिस कंट्रोल रूमला कळवूनही उद्यापर्यंत आपत्कालीन यंत्रणा पोहोचली नसल्याने मोठा ट्राफिकचा प्रश्न निर्माण झाला असून वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत.

सिंधुदुर्गात येणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या व गॅसच्या गाड्या यामध्ये अडकून पडल्याचे वेंगुर्ला- मानसिश्वर पेट्रोल पंपाचे मालक विलास कुबल यांनी सांगितले.

12

4