स्थानिक मच्छीमारांनी वेधले आमदार, मत्स्य अधिकाऱ्यांचे लक्ष ; मच्छीमार आक्रमक…
मालवण, ता. ३० : येथील किल्ल्यानजीकच्या समुद्रात ११ वावात परराज्यातील हायस्पीड पर्ससीन ट्रॉलर्सनी घुसखोरी करत हैदोस घातला आहे.
दरम्यान स्थानिक मच्छीमारांनी आमदार वैभव नाईक तसेच मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यानुसार देवगड येथून गस्तीनौका कारवाईसाठी पाठविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.
मासेमारी हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात परराज्यातील पर्ससीन धारकांनी घुसखोरी करण्यास सुरुवात केली आहे. काल रात्रीपासून ही घुसखोरी सुरूच असून आज सकाळीही किल्ल्या नजीकच्या समुद्रात शेकडो पर्ससीन धारकांकडून मासळीची लूट सुरू आहे. त्यामुळे मच्छीमार आक्रमक बनले आहे.