सुदैवाने आई व बाळ वाचले:रिक्षाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान…
सावंतवाडी ता.३०: येथील कुटीर रुग्णालय परिसरात असलेल्या आंब्याच्या झाडाची भली मोठी फांदी रिक्षावर कोसळून झालेल्या अपघातात रिक्षाचालकासह ४ महिन्याचे बाळ व तिची आई सुदैवाने बचावली आहेत.मशिरा इक्बाल मिहिर व महानूर इक्बाल मिहीर रा.बुराणगल्ली-बाहेरचावाडा अशी माय-लेकाची नावे आहेत.ही घटना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष गजानन सावंत यांच्या मालकीची ही रिक्षा आहे.यात रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
संबंधित झाड जीर्ण झाल्यामुळे ते तोडण्यात यावे अशी मागणी नागरिकांसह राजकीय पदाधिकाऱ्यांकडून याआधी करण्यात आली होती.मात्र संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अनर्थ घडला आहे.असा आरोप शिवसेचे उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार यांनी केला आहे.घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी येऊन पाहणी केली.दरम्यान पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने झाडाची तुटलेली फांदी हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.