पहाटेपासून पावसाची संततधार सुरू
वैभववाडी/पंकज मोरे आठवडाभराच्या विश्रांती नंतर शुक्रवारी पहाटेपासूनच तालुक्यात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले.
गणेश चतुर्थी अवघ्या तीन दिवसांवर येवून ठेपली आहे. गणेश भक्त बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जिल्ह्यात घरोघरी बाप्पाच्या स्वागताची जय्यत सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. सकाळपासूनच मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने गावात दाखल होत आहेत.
अॉगस्टच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार झालेल्या अतिवृष्टीत जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान आठवडाभर पावसाने विश्रांती घेतल्याने जनजीवन पूर्वपदावर आले आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली.