चार मच्छीमार बचावले ; मासेमारी जाळीचे नुकसान…
मालवण, ता. ३० : सर्जेकोट कवडा रॉक लगतच्या समुद्रात मासेमारीस गेलेली मासेमारी नौका पहाटे वाऱ्यामुळे भरकटत जाऊन पलटी झाल्याची घटना घडली आहे. नौकेवरील चार मच्छीमार सुदैवाने बचावले. यात मासेमारी जाळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सर्जेकोट येथील प्रसाद पाटील यांच्या मालकीची नौका आज पहाटे मासेमारीसाठी गेली होती. नौकेत चार मच्छीमार होते. कवडा रॉक येथील समुद्रात ते मासेमारी करत असताना अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नौका भरकटली आणि पुढे जाऊन पलटी झाली. यात चारही मच्छीमार समुद्रात फेकले गेले. मासेमारी नौका जाळ्यासह वाहून गेली. काही वेळापूर्वी ही नौका तळाशील येथील समुद्रकिनारी आढळून आली आहे.