बांदा नट वाचनालयाच्या वतीने २४ ला खुली वाचक स्पर्धा…

45
2

बांदा,ता.१२: सांस्कृतिक वारसा लाभलेल्या नट वाचनालय, बांदा या संस्थेमार्फत विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. असाच एक वाचक व रसिकांसाठी खुली वाचक स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा २४ फेब्रुवारीला सायंकाळी ४ वाजता वाचनालयाच्या नाडकर्णी सभागृहात होणार आहे.

स्पर्धेचे विषय पु. ल. देशपांडे, ह. मो. मराठे, साने गुरुजी या तीन साहित्यिकांपैकी एका साहित्यिकावर परीक्षण करावयाचे आहे. त्यासाठी वेळ १० मिनीटे देण्यात आला आहे. तरी साहित्यप्रेमी रसिकांनी या खुल्या वाचक स्पर्धेत भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन वाचनालयाच्यावतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे २१ फेब्रुवारी पर्यंत ९४०५५७०३४९ या मोबाईल नंबरवर द्यावीत.

4