जिभेला लगाम घाला, अन्यथा तुमचा “बाजा” वाजवू…

379
2

मंदार नाईक; संदीप दळवींना उपरकरांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही…

सावंतवाडी,ता.१२: परशुराम उपरकर यांच्यावर टीका करणाऱ्या संदीप दळवी यांनी आपल्या जिभेला लगाम घालावा अन्यथा त्यांचा “बाजा” वाजवू, असा इशारा उपरकर समर्थक मंदार नाईक यांनी दिला आहे. स्वतःचा फोटो वापरला नाही म्हणून मनसैनिकांशी हूज्जत घालणाऱ्या दळवी यांचे मनसेच्या वाढीसाठी योगदान काय? असा सवाल करून सिंधुदुर्गात जबाबदारी स्वीकारल्यानंतर मनसे बरखास्त करण्याचे काम यांनी केले आहे. त्यामुळे त्यांना उपरकर यांच्या पक्षनिष्ठेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. काल मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपरकर यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती, त्याला श्री. नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे.

त्यात असे म्हटले आहे की, सिंधुदुर्गात ८०% मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी संदीप दळवी व गजानन राणे यांच्या सुडबुद्धीला कंटाळून राजीनामे दिले ते आज माजी आमदार परशुराम उपरकरांवर टीका करतायेत हे हास्यास्पद आहे. मुळात सावंतवाडी सहित जिल्ह्यात मेळाव्यासंबंधी लावलेले बॅनर हे वर्षानुवर्षे पक्षाचे काम केलेल्या माजी मनसैनिकांनी उत्स्फूर्तपणे लावले आहेत, एवढेही संदीप दळवींना कळले नाही हे दुर्दैव आहे. वास्तविक सिंधुदुर्ग नाही तर मुंबईत त्यांच्या प्रभागात सुद्धा बॅनर वर फोटो टाकला नाही म्हणून कार्यकर्त्यांशी हुज्जत घालणाऱ्या दळवींच्या बुद्धीची कीव करावी तेवढी कमीच आहे. ते ज्या आरोस गावचे मूळ रहिवासी आहेत, त्याच गावात मनसेच्या शाखेच्या सदस्यांनी राजीनामे देऊन शाखा पूर्णपणे बरखास्त केली. त्या गावात पैसे देऊन भाडोत्री माणसं बैठकींना आणावी लागतात हे संदीप दळवींचे आजपर्यंतचे पक्ष कार्य सावंतवाडीत सर्वश्रुत आहे. मागील ४० वर्षात कार्यकर्त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होणारे व त्यांच्या मदतीला धावून जाणारे जीजी उपरकर कुठे आणि पक्षातील नवोदित कार्यकर्त्यांना क्रिकेट स्पर्धा किंवा पक्षाचे कार्यक्रम करा मी पैसे पुरवतो असे सांगून नंतर फोन न उचलण्याचे प्रकार करून पक्षातील कार्यकर्त्यांना आर्थिक दृष्ट्या अडचणीत आणणारे संदीप दळवी कुठे हे जिल्ह्यातील महाराष्ट्र सैनिकांना चांगलेच माहिती आहे. इ स्टोर व ग्रामीण कुटा बँक मार्केटिंग मध्ये फसवणूक झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांना पैसे परत मिळवुन देतो असे सांगत मेळाव्यासाठी भर भरून आणले गेले, त्यांच्यासाठी प्रेस घेण्यात आल्या मात्र त्यानंतर त्याचे पुढे काय झाले? पाणी कुठे मुरले याचे आधी उत्तर तुम्ही जिल्ह्यातील जनतेला देण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे उपरकर यांनी आजपर्यंत अनेक मोर्चे अनेक आंदोलन स्वबळावर जनतेसाठी केली मग ते कोविडचे प्रश्न असो किंवा आरोग्याचे त्यामुळे निदान तेवढं तरी तुम्ही करून दाखवा असं प्रति टोला श्री नाईक यांनी लगावला. कोणतेही आंदोलन “जोमाने काम करा मी तुमच्यासाठी खिसा रिकामा करतो” असे मोठ्या तावातावात सांगणाऱ्या संदीप दळवींनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षच अगदी रिकामा करून टाकला हे खरे वास्तव असून असून संदीप दळवी यांनी वेळीच आपल्या जिभेला लगाम लावावा अन्यथा आम्ही “बाजा” वाजवू, असा सूचक इशारा मनसेचे माजी पदाधिकारी मंदार नाईक यांनी दिला आहे.

4