माहितीचा अधिकार टाकून “किराणा” भरणाऱ्यांनी मनसे नेत्यावर टीका करू नये…

270
2

विष्णू वसकर; ८० टक्के मनसैनिक तुमच्याबरोबर, मग दुसऱ्या पक्षाचे उंबरे का झिजवताय…?

बांदा,ता.१२: माहितीचा अधिकार टाकून आणि पक्षाचा कार्यक्रम आहे असे सांगून स्वतःच्या घरातील किराणा भरणाऱ्यांनी मनसेचे जिल्हा पक्ष निरीक्षक गजानन राणे यांच्यावर बोलणे म्हणजे हास्यास्पद आहे, असा प्रत्यारोप मनसेचे बांदा विभाग अध्यक्ष विष्णू वसकर यांनी केला आहे. ८० टक्के मनसैनिकांचा उपरकरांना पाठिंबा असेल तर त्यांना दुसऱ्या पक्षाचे दरवाजे का झिजवावे लागतात? याचे त्यांनी उत्तर द्यावे, असे त्यांनी म्हटले आहे. उपरकर समर्थक अभय देसाई यांनी काल प्रसिद्धीपत्रक देऊन मनसेचे नेते गजानन राणे व दळवी यांच्यावर टीका केली होती. याला वसकर यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.

माहितीचा अधिकार टाकून त्यातून पैसे कमावणे किंवा पक्षाचा कार्यक्रम आहे असे सांगून व्यावसायीकांकडून पैसे घेऊन स्वतःच्या घरात किराणा भरणे हेच या कंपूचे कामच आहे, निवेदने देत फिरायचे आणि त्यातून कमाई करायची हेच यांचे उद्योग. राहिला प्रश्न ८० टक्के मनसैनिकांचा उपरकर यांना पाठिंबा आहे मग त्यांना दुसऱ्या पक्षांचे दरवाजे का झिजवावे लागत आहेत? अद्याप त्यांनी दुसऱ्या कुठल्या पक्षात प्रवेश का केला नाही याचे उत्तर अभय देसाई यांनी द्यावे. नाही तर आपली पात्रता काय आहे ते बघून गप्प बसावे. लवकरच त्यांच्या समर्थकांना राजकीय संन्यास घ्यावा लागणार आहे. मनसे यांची चालू असलेली आरटीआयची दुकाने बंद करणार हे नक्की.

4