कोकण रेल्वेचे टप्प्याटप्प्याने दुपदरीकरण

580
2
Google search engine
Google search engine
Google search engine

विनायक राऊत: भारतीय रेल्वेकडे १५ हजार कोटी मागितले

सावंतवाडी ता.३०: कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्प्याने करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत.त्यासाठी भारतीय रेल्वेकडे पंधरा हजार कोटीची मागणी करण्यात आली आहे.रोहा ते वीर आणि वीर ते रायगड असे दुपदरीकरण झाल्यानंतर सावंतवाडीचा विचार करण्यात येणार आहे त्यामुळे टर्मिनल्सचा दर्जा मिळाल्यानंतर सावंतवाडी रेल्वे स्थानकावर बऱ्याच गाड्यांना थांबा मिळेल असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी आज येथे व्यक्त केला.
जनशताब्दी गाडीला सावंतवाडी रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर गाडीचे स्वागत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री.राऊत बोलत होते.यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर,पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर,उपसभापती संदीप नेमळेकर,उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर संजय पडते आदी उपस्थित होते.
यावेळी श्री राऊत म्हणाले गेली अनेक वर्षे या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या थांबविण्यात याव्या अशी येथील लोकांची मागणी होती त्यासाठी कोकण प्रवासी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलनाची दखल घेऊन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून जनशताब्दी गाडे याठिकाणी थांबवण्यात यश आले आहे भविष्यात आणखी काही गाड्या थांबवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे

\