विनायक राऊत यांचा आरोप: संबंधिताला टर्मिनेट करण्याची मंत्र्यांकडे मागणी
सावंतवाडी ता.३०: केवळ आयआरबी या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे यावर्षी सिंधुदुर्ग विमानतळावरून विमान उतरू शकले नाही.असा आरोप करीत संबंधित ठेकेदाराला टर्मिनेट करून त्याच्याकडून विमानतळ काढून घ्या,अशी मागणी आपण उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.असा दावा खासदार विनायक राऊत यांनी आज येथे आयोजित कार्यक्रमात केला.
विमानतळावर यावर्षी विमान उतरू शकले असते.त्यासाठी आवश्यक असलेली सर्व उपाययोजना करण्यात आली आहे.यात विजेची सोय,पाण्याची सोय यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भरीव निधी दिला आहे.लाईट विमानतळापर्यंत पोहोचली परंतु त्यासाठी आवश्यक असलेला ट्रांसफार्मर कंपनीने बसवला नसल्यामुळे वरिष्ठ यंत्रणेने परवानगी देण्यास नकार दिला.त्यामुळे विमान उतरू शकले नाही.ही वस्तुस्थिती आहे.त्यामुळे कोणी केवळ टीका करण्यासाठी टीका करत असतील तर ते चुकीचे आहे.येणाऱ्या काळात लोकांची मागणी लक्षात घेता त्या ठिकाणी विमानतळ सुरू होणे काळाची गरज आहे.त्यामुळे निष्काळजीपणा दाखवणाऱ्या संबंधित ठेकेदाराला तात्काळ टर्मिनेट करून विमानतळ ताब्यात द्या अशी मागणी आपण केली आहे.तसे झाल्यास त्याचा फायदा निश्चितच होणार आहे,असे राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितले.
विमान उडू देणार नाही असे म्हणणार्या लोकांना आपण योग्य ती जागा दाखवून देऊ आणि ज्यांनी आयुष्यभर विरोध केला तेआणखीन काय करतील असा सवालही यावेळी श्री राऊत यांनी उपस्थित केला.