खेळ जीवनाचा अविभाज्य घटक…!

2

अर्चना घारे-परब;गोगटे-वाळके महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात…

बांदा, ता.३०: येथील गोगटे-वाळके महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने आयोजित क्रीडा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना अर्चना फाऊंडेशनच्या अर्चना घारे-परब यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात करण्यात आले.
प्रमुख पाहुण्या अर्चना घारे-परब यांनी विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून अधिकाधिक गुणी खेळाडूंना व्यासपीठ मिळावे,क्रीडाक्षेत्रासाठी उत्तम पायाभूत सुविधा आणि निधीची उपलब्धता व्हावी आणि त्यातून आपल्या भागातून उत्तमोत्तम खेळाडू तयार व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आजच्या युवांनी करियर,अभ्यास यासोबतच आपल्या फिटनेससाठी तरी मैदानी खेळ खेळले पाहिजे,यातूनही गुणवान खेळाडू पुढे येऊ शकतात. खेळ हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे, विशेषतः मैदानी खेळ व्यक्तिमत्व विकास घडवतात,सांघिक भावना निर्माण करतात असेही अर्चना घारे-परब यावेळी बोलताना म्हणाल्या.
यावेळी चेअरमन डी. बी.वारंग, सचिव श्री.सावंत, प्राचार्य श्री.सावंत,श्री.शिरोडकर, श्री.काजरेकर,सौ.कुणकेरकर यांच्यासह इतर प्राध्यापक वृंद, कर्मचारी उपस्थित होते.

36

4