परशुराम उपरकर:नुसती भुमीपुजने,उदघाटने करून केसरकरांकडुन जनतेची दिशाभूल…..
सावंतवाडी ता 30
निविदा मंजूर न झालेल्या तसेच प्रशासनाची परवानगी न मिळालेल्या प्रकल्पाचे उद्घाटन करून पालकमंत्री दीपक केसरकर जनतेची दिशाभूल करत आहेत.असा आरोप मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे केला.
सावंतवाडी झालेल्या राज्य सुरक्षा केंद्रासाठी आवश्यक असलेली जागा अद्याप पर्यंत संबधित केंद्राकडे वर्ग करण्यात आलेली नाही तसेच झाराप-पत्रादेवी महामार्गावर उभारण्यात येणाऱ्या प्रवेशद्वाराला महामार्ग प्राधिकरणाची परवानगी मिळालेली नाही त्यामुळेच आजचे उदघाटन रद्द करण्याचा निर्णय केसरकरांना घ्यावा लागला असे उपरकर यांनी सांगितले
मळगाव येथील हॉटेल शालू मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उपरकर बोलत होते यावेळी ते म्हणाले आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर करत असलेले उद्घाटने भूमिपूजन ही सर्व काही बोगस आहेत त्यासाठी आवश्यक असलेली परवानगी त्यांना घेता आली नाही केवळ आपल्याला क्रेडिट मिळावे यासाठी उद्घाटने भूमिपूजन करून केसरकर जनतेची दिशाभूल करत आहेत ते पुढे म्हणाले सावंतवाडीला कबीरचा दर्जा असताना केवळ एका गाडीला थांबवून केसरकर डोंगर पोखरून उंदीर काढल्याचा आव्हानं आहेत विमान उतरवण्याचे स्वप्न राहिले आहे खोटे सांगून लोकांची दिशाभूल करणाऱ्या केसरकर यांच्या पोलखोल केली आहे असाही आरोप यावी उपरकर यांनी केला