सीईओ के मंजुलक्ष्मी यांचे आवाहन;केंद्रीय स्वच्छ भारत मिशन उपक्रम..
सिंधुदुर्गनगरी ता.३०: जिल्हा स्वच्छतेच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहिला आहे.स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत केंद्रिय पेयजल व स्वच्छता (जलशक्ती) मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ सर्व्हेक्षण (ग्रामीण) २०१९ ची घोषणा करण्यात आली आहे. जिल्हावासियांनी SSG2019 मोबाईल ॲपच्या माध्यमातुन आपली प्रतिक्रिया नोंदवुन नेहमीप्रमाणे आपला ‘स्वच्छ सुंदर सिंधुदुर्ग’ स्वच्छतेच्याबाबतीत देशात अव्वल ठेवावा,असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.तसेच यंदाचा गणेश उत्सव प्लॅस्टिक, फटाके यांचा वापर न करता साजरा करुया असे आवाहन त्यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता (जलशक्ती) मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2019 दिनांक 14 ऑगस्ट ते दिनांक 15 सप्टेंबर 2019 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सेवा पातळीवरील प्रगती, सार्वजनिक ठिकाणाचे थेट निरिक्षण, नागरिकांची प्रतिक्रिया या 3 घटकांवर हे सर्व्हेक्षण होणार आहे. नागरिकांच्या प्रतिक्रिया यामध्ये गावातील महत्वाच्या व्यक्तींच्या प्रतिक्रिया केंद्राच्या समितीच्या माध्यमातुन घेण्यात येणार आहेत. तर SSG2019 मोबाईल ॲपच्या माध्यमातुन ग्रामस्थांच्या online प्रतिक्रिया द्यावयाच्या आहेत. गतवर्षी आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 मध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची केंद्र सरकारच्यावतीने करण्यात आलेल्या प्रत्यक्ष पाहणीत देशात पहिला क्रमांक प्राप्त झाला होता. आपला जिल्हा स्वच्छतेच्या बाबतीत देशात अव्वल असुनही केवळ नागरिकाच्या प्रतिक्रिया कमी प्रमाणात आल्याने आपण या निकषाच्या आधार अव्वल ठरु शकलो नाही. आपल्या जिल्ह्याने स्वच्छतेच्या बाबतीत केलेल्या स्पृहणिय कामगिरीची पोच पावती जिल्हावासियांनी आपल्या प्रतिक्रियेव्दारे नोंदविल्यास नक्किच आपला जिल्हा देशात अव्वल ठरणार आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्याच्या तुलनेत नागरी लोकवस्तीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे आपोआपच मोबाईल धारकाची संख्याही फारच कमी आहे. त्यामुळे प्रतिक्रिया नोंदविण्याची संख्याही कमी होते. आपणच आपल्या कामगीरीची प्रशंसा केल्यास एखाद्या चागल्या कामाला स्वत:च्या घरातुन पाठिबा मिळाल्यासारखे होईल. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत मिळालेले हे यश, सातत्या प्रत्येक स्तरावर, निकषावर टिकेल हे निश्चित आहे.
स्वच्छता प्रिय असणा-या आपल्या जिल्ह्याला स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2019 मधे अव्वल स्थान राखण्यासाठी यंदाच्या गणेश उत्सव कालावधीत जिल्हावासियांनी गुगल प्लेस्टोअर मधुन SSG 2019 हे ॲप डाऊनलोड करुन. स्वच्छतेबाबत विचारलेल्या चार प्रश्नाची योग्यती उत्तरे निवडुन प्रतिक्रिया नोंदवाव्यात. ज्या जिल्हावासीयांकडे android based स्मार्ट फोन नसतील अशा जिल्हावासियानी आपला प्रतिसाद 18005720112 या टोल फ्री क्रमांकावर नोंदवावयाचा आहे. आपण कायमच आम्हाला दिलेल्या साथीमुळे आम्ही कायम राज्यात नव्हे तर देशात अव्वल ठरलो आहोत. स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामींण 2019 मध्ये आपल्या सहकार्याची गरज आहे. आपण मोबाईल ॲप व टोल फ्रि नंबरवरुन जिल्ह्याला दिलेले एक मतामुळे आपला जिल्हा स्वच्छतेत अव्वल राहणार आहे. जिल्हावासिय पुन्हा एकदा स्वच्छतेच्या बाबतीत प्रतिक्रिया देऊन जिल्हा परिषदेला स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मध्ये नामांकन मिळवुन देतील अशी खात्री आहे. अशी आशा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी व्यक्त केली आहे.