वेंगुर्लेतील रामेश्वर मंदिरात वरदशंकर व्रतपुजेंची सांगता

2

श्रींच्या पुष्पपुजेसहीत आज बांधल्या श्री वरदशंकर, श्री सत्यविनायक, श्री सत्यदत्त, श्री सत्यअंबा, श्री सत्यनारायण पूजा

वेंगुर्ले.ता,३०: वेंगुर्ले येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात सुरु असलेल्या वरदशंकर व्रतपूजेंची सांगता आज ३० ऑगस्ट रोजी झाली. यानिमित्त मंदिरात श्री वरदशंकर, श्री सत्यविनायक, श्री सत्यदत्त, श्री सत्यअंबा, श्री सत्यनारायण पूजा करण्यात आल्या. तसेच श्रींची पुष्पपुजाही बांधण्यात आली.
येथील प्रसिद्ध रामेश्वर मंदिरात श्रावण मासानिमित्त भक्तांच्या सहकार्याने सोमवार व गुरुवार या दिवशी वरदशंकर व्रतपूजेचे आयोजन करण्यात आले होते. चारही सोमवारी श्रींची पुष्प, फळ, चंदन, लोणी आदींची पूजा बांधण्यात आली. या वरदशंकर व्रतपूजेंची सांगता आज अमावास्येला झाली. यानिमित्त मंदिरात श्री वरदशंकर, श्री सत्यविनायक, श्री सत्यदत्त, श्री सत्यअंबा, श्री सत्यनारायण व श्रींची पुष्पपूजा बांधण्यात आली होती. या आयोजनामुळे भविकानीही श्रीच्या दर्शनाचा लाभ घेतला.

8

4