भुरशी, निळे भुंगरे-करपामुळे पीके धोक्यात
सिंधुदुर्गनगरी.ता,३०: सावंतवाडी तालुक्यात काजू पिकावर पडलेल्या ‘भूरशी’ रोगाच्या आणि भात पिकावर पडलेल्या निळे भुंगरे व करपा रोगाच्या पार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाकडून काजू बगायतींची व भात शेतीची पाहणी करण्यात आली. यावेळी या शास्त्रज्ञानी काजू बागायतदार व शेतकऱ्यांना संबंधित रोग पसरण्याची कारणे आणि उपाययोजना यावर मार्गदर्शन केले असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक विभागाकडून देण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात माहे ऑगस्ट पासून काजू पिकावर पानगळ, पानकुज आणि फांद्या वाळण्याची समस्या निर्माण झाली होती. ही समस्या सावंतवाडी तालुक्यात या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. तसेच जिल्ह्यातील भात पिकावर निळे भुंगरे व करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठाच्या शस्त्रज्ञानकडून २९ ऑगस्ट रोजी फणसवडे, केसरी, असनिये, घारपी, भोम, निरुखे, तुळस, मातोंड गावात पाहणी करण्यात आली. यावेळी शास्त्रज्ञ डॉ. मुंज व डॉ. गजबीय, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सतत पडणारा पाऊस, धुके, सूर्यप्रकाश न मिळणे याकारनांमुळे काजू पिकावर ‘भूरशी’ रोगाचा तर भात पिकावर निळे भुंगरे व करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याचे शास्त्रज्ञानी स्पष्ट केले. तसेच यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना भात पिकवरील निळे भुंगरे रोगसाठी सारपरमेथीन किंवा लॅमडा औषधाची तर करपा रोगासाठी बावीस्टीन/कार्बनडेझीन औषधांची फवारणी करण्यास सांगितले. तसेच काजू पिकाला लागण झालेल्या भूरशी रोगसाठी बोर्डोमिश्रणची फवारणी करण्यात यावी आणि भूरशी रोगाची लागण झालेल्या फांद्या व पाने तोडून त्यांची बागेपासून दूर अंतरावर व्हिलेवाट लावावी असे आवाहनही करण्यात आले आहे.