स्वच्छतेचे पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती, सरपंच स्वच्छतेचे आयडॉल…

179
2
Google search engine
Google search engine

रवींद्र चव्हाणांकडून कौतुक; संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे पुरस्कार वितरण..

सिंधुदुर्गनगरी,ता.१६: पूर्ण गावाचे आपण प्रतिनिधित्व करीत आहात. गावच्या अपेक्षांचे ओझे आपल्यावर आहे, याची जाणीव ठेवून त्या दृष्टीने काम केले पाहिजे, पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती व सरपंच हे स्वच्छतेचे आयडॉल आहेत. यांच्या कामाचे अनुकरण बाकीच्यांनी केले पाहिजे. असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेच्या पुरस्कार वितरण प्रसंगी बोलताना केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धे अंतर्गत जिल्हा परिषद प्रभागात प्रथम तसेच जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय आणि विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छ्ता कर्मचारी यांचा सिंधुदुर्गनगरी येथील इच्छापूर्ती मंगल कार्यालय सभागृहात सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक विनायक ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, मनोज रावराणे, ओरोस सरपंच आशा मुरमुरे, मिलिंद सामंत, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, आत्मज मोरे, वासुदेव नाईक, वृषाली यादव, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुधाकर ठाकूर यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.