राष्ट्रवादीच्या स्वराज्य सप्ताहाला कणकवलीत उत्स्फूर्त प्रतिसाद… 

27
2
Google search engine
Google search engine

शासनाच्या योजना घरोघरी पोहोचवा; अबिद नाईक यांचे आवाहन…

कणकवली,ता.१६: राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आपले सरकार या संकल्पनेतुन स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. छत्रपतींच्या कार्याची माहिती व्हावी व स्वराज्य संकल्पना जनसामान्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले.

यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजू, विद्यामंदिर मुख्याध्यापक पी. जे.कांबळे, पर्यवेक्षिका सौ. व्ही व्ही. जाधव, राष्ट्रवादी कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, शहराध्यक्ष इम्रान शेख, युवक शहरध्यक्ष निशिकांत कडूलकर, जिल्हा प्रतिनिधी अनिस नाईक, शहर उपाध्यक्ष अमित केतकर, प्रांतीक सदस्य विलास गावकर , दिलीप वर्णे, शहर चिटणीस गणेश चौगुले, बाळू मेस्त्री जिल्हा प्रतिनिधी सचिन अडुळकर जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, श्री. वणवे, श्री. सिंगनाथ, जे. जे. शेळके, श्री. तवटे, सौ. शिरकर, श्री. गावकर, प्रसाद राणे, सौ. पी. पी. सावंत उपस्थित होते.

श्री. नाईक पुढे म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक लोकाभिमुख निर्णय घेण्यात आले. स्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने जनसामान्यांच्या हिताचे घेण्यात आलेले निर्णय आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. शासनाने शेती व त्या अनुषंगाने पूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी मधाचे गाव सारखी योजना ही आणली आहे. रस्ते विकासाच्या बाबतीत शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंडळ कार्यालय ही या जिल्ह्यात आणण्यात आले आहे. बाजार समितीमध्ये शेतकरी भवन उभारण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे. अवकाळी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई राज्यात माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबविण्यात येणार आहे. फळ पिक विमा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली.

असे अनेक लोकाभिमुख निर्णय या सरकारने घेतले. सर्वसामान्य जनतेला राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे आपले सरकार वाटते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सर्वच आघाड्यांवर नंबर एकचे राज्य बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आमचे सरकार अनेक लोकाभिमुख निर्णय घेत असून हे निर्णय म्हणजेच स्वराज्याच्या दृष्टीने सुरू असलेली वाटचाल आहे. आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करून विविध उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांना आपणा सर्वांचे मिळालेली साथ निश्चितच कौतुकास्पद असून आपण यापुढे अशीच साथ द्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सिंगनाथ यांनी तर आभार विलास गांवकर यांनी मानले.