करुळ घाटाट दरड कोसळली

2

वाहतूक काही काळ ठप्प; उशिरा वाहतूक सुरळीत

वैभववाडी.ता. ३०: तालुक्यात शुक्रवारी पहाटे झालेल्या जोरदार पावसाने करुळ घाटात दरड कोसळली. त्यामुळे तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान दुपारी सा. बां. च्या कर्मचाऱ्यांनी दरड बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली.
तालुक्यात शुक्रवारी पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. दुपारी झालेल्या जोरदार पावसाने करुळ घाटात गगनबावड्यापासून सुमारे २ कि. मी. अंतरावर दरड कोसळली. त्यामुळे तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने दरड बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली.

5

4