2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वैभववाडी.ता,३०: ठाणे जिल्हास्तरीय घेण्यात आलेल्या अशटेडू मर्दानी आखाडा चॅम्पियनशिप हँडफाईट स्पर्धेत वैभववाडी तालुक्यातील करूळ गावचा सुपुत्र आर्यन विजय कोलते याने सुवर्णपदक पटकाविले आहे. शासनमान्य अशटेडू मैदानी आखाडा खेळात हस्तकला, शिवकला व संतुलन या खेळांचा समावेश आहे. हँडफाईट स्पर्धेत आर्यनने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्र अशटेडू मर्दानी आखाडा असोसिएशन मार्फत झालेल्या राज्यस्तरीय अशटेडू मर्दानी आखाडा स्पर्धेत हँडफाईट खेळात आर्यनने रजत पदक मिळविले आहे. आर्यन सध्या ठाणे येथील पॅस सायन्स ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. आर्यनला प्रशिक्षक बाळा साठे यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो – आर्यन कोलते.
Download WordPress Themes Nulled and plugins.