मुंबई-थीवीम गणेश चतुर्थी स्पेशल ट्रेन अचानक रद्द..

2

चाकरमान्यांतून संताप:रेल्वे प्रशासनाचे मात्र कानावर हात…

मुंबई ता ३०: गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या गाड्यांपैकी मुंबई- थीवीम ही स्पेशल ट्रेन आज अचानक रद्द करण्यात आली.याबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.परंतु अचानक गाडी रद्द झाल्यामुळे रेल्वे स्थानकावर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा झाला आहे.
त्यामुळे त्याठिकाणी असलेल्या चाकरमाने जोरदार नाराजी व्यक्त केली.अशाप्रकारे अचानक कोणतीही कल्पना न देता गाडी रद्द करणे चुकीचे आहे.चतुर्थी पूर्वी ही परिस्थिती मग चतुर्थी काळात काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.ही गाडी रात्री साडे आठ वाजता सुटणार होती.

18

4