वैभववाडी महसूल कर्मचारी ३१ रोजी एकदिवशीय लाक्षणिक संपावर…

2

वैभववाडी ता.३०: महाराष्ट्र महसूल कर्मचारी संघटनेने महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात संप पुकारला आहे. या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्हा महसूल कर्मचारी संघटना सहभागी झाले असून वैभववाडी तालुका महसूल संघटनेने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
शनिवार दि. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी वैभववाडी तालुका महसूल संघटना एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारणार आहे. तसेच ५ सप्टेंबर पूर्वी शासन स्थरावर प्रलंबित मागण्यांसंदर्भात योग्य निर्णय न झाल्यास बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या पुकारलेल्या आंदोलनाला वैभववाडी तालुका महसूल कर्मचारी संघटना सहभागी होणार आहे.
तसेच एक दिवसाच्या लाक्षणिक संपामध्ये वैभववाडी तालुक्यातील सर्व महसूल कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे या प्रलंबित मागण्यांबाबत शासन स्थरावर ५ सप्टेंबर पर्यंत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यात न आल्यास संघटनेच्या वतीने वैभववाडी तालुक्यातील महसूल कर्मचारी शंभर टक्के या आंदोलनात सहभागी होणार आहेत. असे लेखी निवेदन निवडणूक नायब तहसीलदार एस. के. कासकर व अव्वल कारकून एस. एन. खाडे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी तहसीलदार वैभववाडी यांना दिले आहे.

10

4