दीपक केसरकर:बांदा सिमेवरील प्रवेशद्वाराचे रविवारी उद्घाटन…
सावंतवाडी ता.३०: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरबाधीताना गौरी-गणपती सणाच्या निमित्ताने प्रत्येकी पाच हजार रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे.रविवारी बांदा पचंक्राेशीतील सुमारे ३५० पुरबाधीताना वाटप केले जाईल तसेच सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा महामार्गावरील पर्यटन प्रकल्प ,प्रवेशद्वार आणि दिशादर्शक प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे .
जिल्ह्यातील पूरबाधीताना नंतर वाटप केले जाणार आहे .रविवारी बांदा सटमटवाडी तपासणीनाजा या महामार्गावर सुमारे साडेपाच कोटींचे पर्यटन प्रकल्प , दिशादर्शक व प्रवेशद्वाराचे भूमिपूजन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होईल .
पालकमंत्री केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटनाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न चालविले आहे त्यांनी मुंबई गोवा महामार्गावरील बांदा पत्रादेवी प्रवेशद्वारी असणाऱ्या तपासणी नाक्याच्या येथे दिशादर्शक फलक ,प्रवेश द्वार, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाची वैशिष्ट्ये दाखवणारा फलक यासाठी सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे त्याचे भूमिपूजन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होईल असे सांगण्यात आले .
आज होणारे भूमिपूजन अतीवृष्टीमुळे होऊ शकले नाही ते रविवार दि.१ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता होईल असे सांगण्यात आले.जिल्ह्याच्या पर्यटनाचे वैशिष्ट्य दाखवणारे फलकांसाठी व निवासासाठी ,स्वच्छतागृह आणि सुविधांसाठी सुमारे साडेपाच कोटी रुपये मंजूर केले आहेत .
पत्रादेवी येथील प्रवेशद्वाराच्या तिथे पर्यटकांना निवास व्यवस्था ,खेळण्यासाठी खेळणी स्वच्छतागृह अशा पायाभूत सुविधांचे काम होईल त्याचे भूमिपूजन रविवारी होणार आहे असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले .
महामार्गावरील या प्रवेशद्वाराच्या इथे तपासणी नाक्यावर पोलीस ,आरटीओ व उत्पादनशुल्क खात्याचे एकाच ठिकाणी तपासणी होईल या तपासणी दरम्यान वाहने थांबतील. यासाठी पर्यटन सुविधा केंद्र आणि पायाभूत सुविधा त्या ठिकाणी उभारण्यात येत असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
या ठिकाणी एकाच वेळी चेकिंग होईल पुन्हा जिल्ह्यात कोणत्याही खात्याची चेकिंग होणार नाही असे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी बोलताना सांगितले .बांदा गाव यामुळे पर्यटन नकाशावर येईल .बांदा ते आराेंदा या तेरेखाेल खाडीत बाेट सुविधा देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री केसरकर म्हणाले .
महामार्गावरील बांदा तपासणी नाक्यावर या पर्यटन पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जागा उपलब्ध करून दिली आहे असे पालकमंत्री केसरकर म्हणाले.
या प्रवेशद्वाराच्या भूमिपूजन नंतर बांदा शेरले ,इन्सुली भागातील घरात पुराचे पाणी जाऊन लोकांचे नुकसान झाले आहे.त्यांना शासनाने प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत दिली आहे आता माझ्या मित्रमंडळींकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत रविवारी दिली जाणार आहे .माझे मित्र दिलीप लातये , विकास वालावलकर अशा अनेंक मित्रांनी पूर बाधितांना मदत देऊ केली आहे तिचे वाटप गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर केले जाणार आहे असे पालकमंत्री केसरकर म्हणाले.सुमारे ३५० लोकांना बांदा येथे प्रत्येकी पाच हजार दिले जातील .त्यानंतर जिल्ह्यातील सुमारे दाेन हजार पैकी सावंतवाडी ,वेंगुलेॅ व दाेडामागेॅ मतदारसंघात पंधराशे लोकांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे मदत सणाच्या पार्श्वभूमीवर दिली जाईल असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बोलताना सांगितले .
येत्या रविवारी दि.१ संष्टेबंर ला पूर बाधितांना मदत केल्यानंतर दोडामार्ग येथे मदत दिली जाईल आणि गणपतीच्या दोन दिवसानंतर जिल्ह्यातील अन्य पूर बाधितांना ५हजार रुपये प्रमाणे माझ्या मित्रमंडळी कडील आर्थिक मदत सणाच्या पार्श्वभूमीवर देण्यात येतील असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बोलताना सांगितले.